अवैध मटका व्यवसायामुळे दहशत वाढेल

राष्ट्रवादी कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष अँथोनी स्वामी

देहुरोड – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय हद्दीतील मटका व्यवसायामुळे गॅंगवॉर भडकण्याची शक्‍यता वर्तवित राष्ट्रवादी कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष अँथोनी स्वामी यांनी पोलीस आयुक्‍तांना नुकतेच निवेदन दिले आहे.

नवनिर्वाचित पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील काही पोलीस ठाणे हद्दीत लपून छपून अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील भागीदार असल्याने पोलिसांची अप्रत्यक्षरीत्या परवानगी असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. मटका धंद्याच्या पुणे ग्रामीण हद्दीत किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कादर शेख यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय हद्दीत अनेक ठिकाणी मटके अड्‌डे सुरू केले असून, यामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांना भागीदार करून घेतले आहे.

देहुरोड परिसरातील डॉ. आंबेडकर रोड, पारशी चाळ, मेन बाजार पेठ, भाजी मार्केट, एम. बी. कॅम्प, श्री कृष्णनगर, शितळानगर, निगडी जकात नाक्‍याजवळ, किवळे येथील मुकाई चौक, देहू, तळवडे, देहुरोड पोलीस ठाण्याच्या सीमाहद्दीलगतच्या रावेत येथील लंडन ब्रीजजवळ, बिजलीनगर, देहूफाटा, साईनगर परिसरात हे मटका अवैद्य धंदे राजरोस अद्याप सुरू आहेत. त्यामुळे परिसरामध्ये टोळक्‍यांचे प्रमाण वाढत असून, गॅंगवार भडकण्याची शक्‍यता असल्याची निवेदनात वर्तवण्यात आले आहे.

देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांना थोड्याच दिवसांपूर्वी यासंदर्भातील निनावी पत्राची माहिती मिळताच परिसरात लपून छपून चालणाऱ्या धंद्यावर कारवाई केली आहे. निनावी पत्रात असणाऱ्या नावावरून सर्वांना बोलावित अवैध धंदे बंद ठेवण्यात संदर्भात सज्जड दम देत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)