अवैध प्रवासी वाहतुकीमुळे भोसरी चौकाची कोंडी कायम

पिंपरी – अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे पुणे- नाशिक महामार्गावरील भोसरी येथील वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नाही. आरटीओ, पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई होऊनही पुन्हा ट्राफिकची समस्या राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे जैसे थे असल्याची स्थिती आहे.

चाकणकडे जाणाऱ्या पीएमपी बस, ऑटो रिक्षा, पॅगो रिक्षा, जीप व ओमिनी अशा प्रवासी वाहतुकीचा ताण सध्या भोसरी चौकात पहायला मिळत आहे. ठराविक वेळेनुसारच सुटणाऱ्या पीएमपी बस आणि इच्छितस्थळी थांबणारे अवैध प्रवासी वाहन चालक यामुळे भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे. भोसरीतील पीएमटी चौक ते अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंतचा पुणे-नाशिक महामार्गावरील सेवा रस्त्याचा परिसर म्हणजे अतिशय गर्दीचा भाग. रोजंदारीने कामाला जाणारे अनेक मजूर तिथे सकाळी सातपासूनच उभे असतात. शिवाय अन्य प्रवाशांचीही गर्दी असते. याच ठिकाणी पीएमपीएमएलचे बस टर्मिनल आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथून पुणे, पिंपरी, चिंचवड, हडसपर, कोथरूड, हिंजवडीसह ग्रामीण भागातील चाकणे, म्हाळुंगे, आंबेठाण मार्गावर बस त्यांच्या नियोजित वेळेनुसार सुटतात. मात्र, केव्हाही जा आणि प्रवास सुरू करा, असे साधन म्हणजे ऑटो रिक्षा, पॅगो रिक्षा, जीप, ओमिनी अशी वाहने प्रवासी सांगेल त्या ठिकाणी खासगी वाहन चालक थांबत असल्याने अशा वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एक पीएमपी बस स्थानकावर येऊन मार्गस्थ होईपर्यंतच्या वेळेत पाच-सहा खासगी वाहने भरून निघालेली असतात, असे चित्र रोजच भोसरीत पहायला मिळाले.

बस स्थानकाच्या अगदी समोर या रिक्षा थांबलेल्या असतात त्यामुळे बऱ्याच बसला अडथळा होतो. शिवाय रस्त्यात बेशिस्तपणे या रिक्षा लावलेल्या असतात. त्यामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील रहदारीलाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंगही उद्‌भवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)