अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी- अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई केएसबी चौकाजवळ चिंचवड येथे सोमवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली. मारुती उर्फ बबलू प्रकाश देढे (22, रा. गणेश कॉलनी, पाटील नगर, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे ( गुन्हे ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील कमर्चारी विवेकानंद सपकाळे यांना खबर मिळाली की, केएसबी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर एका टपरीजवळ एक तरुण संशयितरित्या उभा असून त्याच्याकडे एक पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मारुतीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज मिळून आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)