“अवैध पाणीउपसा नियंत्रण’ची गाडी शेतकऱ्यांनी अडवली

जामखेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या अवैध पाणीउपसा नियंत्रण समितीच्या गाडीला रस्त्यावर मोठे दगड टाकून स्थानिक शेतकऱ्यांनी रस्ता अडवला. या समितीत असलेले महावितरणचे अधिकारी हीरामन गावित यांनी या कारवाईकडे पाठ फिरवली. शेवटी उपस्थित अधिकाऱ्यांनी येथील पाणी उपसा करणाऱ्या दोन विद्युत पंपावर कारवाई करीत वीज पुरवठा खंडित केला.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तालुक्‍यातील खैरी, मोहरी, रत्नापूर व भुतवडा तलावात मृत पाणीसाठा शिल्लक आहे. याच अनुषंगाने 11 ऑक्‍टोंबर 2018 रोजी या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अवैध पाणीउपसा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. या समितीवर अध्यक्ष म्हणून तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची निवड झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात रात्रीच्या सुमारास स्थानिक शेतकरी आपले विद्युतपंप सोडून पाणी उपसा करत असल्याची माहिती पाणीउपसा नियंत्रण समितीला समजली, अवैध पाणीउपसा नियंत्रण समितीचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता रामभाऊ ढेपे, कर्मचारी कीलमीशे, नगरपालीका पाणीपुरवठाचे गीते, पोलीस कर्मचारी सय्यद यांच्या पथकाने मंगळवारी (दि.22) रात्री साडेदहाच्या सुमारास भुतवडा तलावातील विद्युत पंपावर कारवाई करण्यासाठी गेले.

यावेळी दोन विद्युत पंपावर कारवाई करुन मध्यरात्री पुन्हा जामखेडकडे येत असताना भुतवडा तलावातील खालच्या बाजूला रस्त्यावर मोठ मोठे दगड टाकुन चारचाकी गाडी अडवली, मात्र गाडीतील पथकातील सदस्य खाली उतरल्याने सर्वजण घटनास्थळाहून पळून गेले. यानंतर रस्त्यावरील दगड बाजूला सारुन हे पथक जामखेडला पोहचले. अवैध पाणीउपसा नियंत्रण समितीचे सदस्य महावितरण विभागाचे शाखा अभियंता हीरामन गावित हे या समितीवर असतानाही या पथकासोबत आले नाहीत, त्यांनी आपला मोबाइल बंद ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)