अवैध पत्राशेडवर पालिकेचा बुल्डोजर

FILE PHOTO

पिंपरी – महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौक, जगताप कॉलनीतील भाजी मंडई परिसरातील आठ अनधिकृत पत्राशेडवर आज (सोमवारी) कारवाई करण्यात आली.

भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या आरक्षण क्रमांक 365 वर सुमारे 2 हजार 960 चौरस फुट जागेमध्ये हे अतिक्रमण झाले होते. महापालिकेने नोटीस बजावूनही त्याला दाद दिली जात नव्हती. अखेर आज महापालिकेच्या “ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली.

एक जेसीबी, एक ट्रक तसेच 7 मजूर, महापालिकेचे 10 अधिकारी, 12 पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु राहणार असल्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)