अवैध दारूसह 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त

कराड – रिक्षातून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन वाहनासह 1 लाख 7 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केला. याप्रकरणी सचिन बबन पोळ (वय 33, रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर) आणि बापू नामदेव पाटणकर (वय 32, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर, मलकापूर), अशी त्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, रिक्षातून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद पवार, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, संजय जाधव, मारूती लाटणे यांनी मलकापूर येथील कृष्णा सरीता बझार समोरील रस्त्यावर सापळा रचून दारू वाहतूक करणारी रिक्षा (क्र. एम. एच. 50, 7679) थांबविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिक्षाची तपासणी केली असता देशी दारूची तीन बॉक्‍स आढळून आली. बेकायदेशीरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी दारूची बॉक्‍स आणि रिक्षा, असा मिळून 1 लाख 7 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस नाईक रामदास तुंबडे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)