अवैध दारु विक्रीप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा

नागठाणे – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बोरगाव पोलिसांनी अवैध दारूविक्री व “ड्रंक अँड ड्राइव्ह’ ची कारवाई करत महिला दारूविक्री करणाऱ्या महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वेणेगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत महिला अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती सपोनि संतोष चौधरी यांना मिळाली होती.

यावेळी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी वेणेगाव येथे छापा टाकला. यावेळी राहत्या घराच्या आडोशाला चोरटी दारूविक्री करत असताना चतुरा भाऊ सोनावले (वय 50) या महिलेस ताब्यात घेतले.तिच्याजवळून पोलिसांनी सुमारे 936 रुपये किमतीच्या 18 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबतची फिर्याद महिला पोलीस तेजस्विनी जगताप यांनी दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी संजय नारायण कुंभार (वय 45 रा. पाडळी, ता. सातारा), निखिल संजय काळभोर (रा. हरपळवाडी, ता. कराड) व विशाल सूर्यकांत राजे (वय 29, रा .नागठाणे) यांच्याविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागठाणे येथील सासपडे चौकात या केसेस करण्यात आल्या असून दोन्ही कारवाईत उपनिरीक्षक एम. ए. खान, सहाय्यक फौजदार भिमराव यादव, संजय दिघे, जवान बाबा महाडिक, किरण निकम, राजू शिखरे, समाधान राक्षे, महिला पोलीस तेजस्विनी जगताप यांनी सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)