अवैध दारु निर्मिती विक्री तिघांना अटक

जामीनावर सुटका : भोर तालुक्‍यात चार ठिकाणी धाड

भोर – भोर तालुक्‍यातील वेळू, हरिश्‍चंद्री, माळेगाव, सांगवी बुद्रुक येथील अवैध दारु निर्मिती आणि विक्रीवर उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी) धाड टाकून सुमारे 41 हजार 330 रुपयांचा साठा जप्त केला. तर तिघांना अटक केली तर एक जण फरारा झाला आहे. अटक केलेल्यांमध्ये एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता तिघांना जामीन मंजूर करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रंजना संतोष रजपूत (रा. माळेगव बुद्रुक), संतोष सुरेश सेजवळ (रा. सांगवी बुद्रुक, ता. भोर), विकास जगदिश बिनावत (रा.वेळू, ता. भोर) असे जामीन मिळालेल्यांचे नावे आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्कचे सासवड विभागाचे उपनिरिक्षक एस के.कानेकर यांनी दिली. कानेकर म्हणाले की, हरिश्‍चंद्री येथील डोंगर रानात दारु तयार करण्याचे दोन टॅंक फोडून रसायन ओतून दिले तर वेळू येथे देशी दारुचे 129 फुगे जप्त करण्यात आले. माळेगांव बुद्रुक येथील दारु धंद्यावर कारवाई करुन 35लिटरचे देशी दारुचे कॅन तर सांगवी बुद्रुक येथील ढाब्यावरील धाडीत देशी दारुचे 5 बॉक्‍स जप्त केले आहे. या कारवाईत एएसआय संदीप लोहोकरे, जवान पी. पी, गौळी, आर. टी. तारळकर, व वाहनचालक राऊत सहभागी झाले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे भोर तालुक्‍यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)