अवैध दारुवाहतूकदारास पाठलाग करुन पकडले

नीरा- पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील जेजुरी-नीरा दरम्यान अवैध गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या एका गाडीचा पाठलाग करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 25 हजार 400 रुपयांचा माल जब्त केला आहे. तसेच एका व्यक्तीला अटक केली आहे.

अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव बसवराज शिव्या गुत्तेदार आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड विभागाचे निरीक्षक एस. के. कान्हेकर, पी. पी. गवळी, आर.टी. तारळकर, एच. सी. राऊत यांच्या पथकाने आज शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान ही कारवाई केली. अधिकाऱ्यांना इंडिका कार (एम. एच. 14 ए. व्ही. 6766) मध्ये गावठी दारु असल्याची माहिती मिळाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध गावठी दारू आढळून आली. चार प्लॅस्टिक कैंडमध्ये दारूची वाहतूक कले जात होती. बसवराज शिव्या गुत्तेदार या वाहनचलकास अटक करण्यात आली असून 25 हजार 400 रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सासवडचे निरिक्षक एस. के. कान्हेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)