अवैध कारवाया रोखण्यासाठी निवडणूक आयोग घेणार सुरक्षा यंत्रणांची मदत

नवी दिल्ली : फेसबुक डेटा लिक प्रकरणात आता देशात चांगलेच वादंग माजत आहे. त्यामुळे आगामी कोणत्याही निवडणुकांवर याचा परिणाम होऊ नये म्हणून निवडणूक आयोग आता महत्वपूर्ण पाउल उचलत आहे. निवडणुकांना प्रभावित करू शकणाऱ्या अवैध कारवाया रोखण्यासाठी आयोग कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत मिळून प्रभावी उपाययोजना करणार आहे.

भारतीय निवडणुकांवर चुकीचा प्रभाव पाडणाऱ्या अवैध कृती रोखण्यासाठी पावले उचलू असे विधान मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी केले. केम्ब्रिज ऍनालिटिका या वादग्रस्त कंपनीची मदत भारतातील अनेक राजकीय पक्षांनी घेतल्याचे अगोदरच समोर आले आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या मुद्यावर एक प्रत्यक्ष अहवाल मागविला जाणार आहे. या अहवालाच्या आधारावरच पुढील योजना तयार केली जाईल. यात कायद्यांमध्ये दुरुस्तीची शिफारस देखील सामील असेल असे रावत म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)