अविवाहित नातीचा देखील मालमत्तेत अधिकार

उत्तर प्रदेश सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभेत महसूल संशोधन विधेयक सादर केले होते. त्यात अविवाहित नातीला देखील आजोबाच्या मालमत्तेच अधिकार देण्याचा समावेश होता. महसूल अधिनियम कलम 108 आणि 110 मध्ये संशोधन करून नातीच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीत एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या मालमत्तेवर पत्नी, मुलगा आणि काही प्रकरणात अविवाहित मुलीला देकील हक्क मिळतो.

मात्र खरी गोम इथेच होते की, खातेदाराअगोदरच त्याच्या मुलाचा मृत्यू होतो. अशा स्थितीत नातवाला मालमत्तेत वाटा मिळतो. अशा स्थितीत नातू मालमत्तेवर अधिकार सांगत असताना अविवाहित नातीला मालमत्तेत हक्क मिळत नव्हता. एखाद्या निपुत्रिक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मालमत्तेचा उत्तराधिकारी भाऊ असतो. जर भावाचा मृत्यू निपुत्रिक व्यक्तीच्या अगोदरच झाला तर त्याचा मुलगा म्हणजे पुतण्या हा मालमत्तेचा उत्तराधिकारी ठरतो. मात्र अविवाहित पुतणीला वाटा मिळत नव्हता. कायद्यातील नवीन दुरुस्तीनंतरच सर्वच ठिकाणी अविवाहित नाती आणि पुतणीला वारसाने आलेल्या मालमत्तेत नातू आणि पुतण्याच्या बरोबरीने वाटा मिळेल.

– विनिता शाह 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)