अविनाश कदम पुन्हा पालिकेत दाखल

विशेष सभेला तब्बल 17 जणांची अनुपस्थिती

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)- नगर विकास आघाडीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अपेक्षेप्रमाणे माजी पक्षप्रतोद अविनाश नानासाहेब कदम यांची मंगळवारी निवड झाली. या निवडीच्या वेळी सातारा पालिकेचे तब्बल तेवीस नगरसेवक गैरहजर होते. जनतेच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवणार व नगर विकास आघाडी सदस्यांच्या वॉर्ड फंडावर कोणतीही गदा येऊ देणार नाही अशी ग्वाही कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

-Ads-

सातारा पालिकेत नगर विकास आघाडीचे स्वीकृत सदस्य अतुल चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिकत झाली होती. या जागेसाठी प्रचंड राजकीय खल झाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार अविनाश कदम यांचा एकमेव अर्ज प्रांत स्वाती देशमुख यांच्याकडे दाखल झाला होता. मंगळवारी झालेल्या विशेष सभेमध्ये पीठासन अधिकारी माधवी कदम यांनी कदम यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. उपस्थित सर्व सदस्यांनी या निवडीचे बाके वाजवून स्वागत केले. नगराध्यक्ष माधवी कदम, नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी कदम यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. नगर विकास आघाडीचा वॉर्ड फंड हा त्या सदस्यांचा अधिकार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सनदशीर मार्गाने वेळोवेळी आंदोलन करणार. नगर विकास आघाडीने वेळोवेळी पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवला आहे तो कायमच ठेवला जाईल जनतेच्या गरजू प्रकल्पांसाठी कायमच सहकार्य करणार व चुकीच्या कामाला विरोध परखडपणे करणार वेळ पडल्यास जनतेला सोबत घेऊन्न आंदोलन करण्याची ग्वाही कदम यांनी प्रभात शी बोलताना दिली.

या विशेष सभेला चाळीस पैकी वीस सदस्यांची कोरम साठी गरज होती. सुरवातीला कोरम भरेल की नाही ही परिस्थिती होती. मात्र सदस्य संख्या तेवीस पर्यंत वाढली. तब्बल सतरा सदस्यांची अनुपस्थिती होती. सभागृहातील बरीच बाकडी रिकामी होती. अचानक रजेवर गेलेले मुख्याधिकारी शंकर गोरे सभागृहात अवतरले. त्यांचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)