अवसरी येथे काढण्यात आला कॅंडल मार्च

अवसरी- दहशतवादी हल्ल्याचा आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथे निषेध करण्यात आला. तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या कॅंडल मार्चमध्ये भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब घुले, दगडू मारुती शिंदे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, उद्योजक प्रशांत अभंग, विवेक टेमकर, सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच राजेंद्र शिंदे, ह.भ.प. बिभीषण महाराज मेंगडे, प्रसाद कराळे, रोहित ढुमणे, शरद बॅंकेचे संचालक विजय टेमकर, बजरंग दलाचे सदाशिव करंडे, भिमाजी शिंदे, दत्तात्रेय कराळे, विठ्ठल शिंदे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. गावातील खालची वेस येथून कॅंडल मार्चला सुरुवात झाली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)