अवसरी बुद्रुक शाळेत पोषण आहार तपासणी

मंचर- अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराची तपासणी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे केली आणि येथील पोषण आहार चांगला असल्याचा अभिप्राय पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी शालेय पोषण आहार योजनेबाबतची माहिती घेऊन रोज शालेय पोषण आहार कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात शिजवला जातो, याबाबत मुख्याध्यापक हेमंत विटकर यांच्याकडून माहिती घेतली. सर्व विद्यार्थी ओळीत शालेय पोषण आहार घेत होते. मदतनीसांमार्फत शालेय पोषण आहाराचे वाटप होत असल्याचे दिसून आले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन हिंगे, निर्मलग्राम कमिटीचे अध्यक्ष अनिल हिंगे, पालक सदस्य गणेश चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडेश हिंगे उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)