अवसरी बुद्रुक येथे 293 जनावरांचे लसीकरण

संग्रहित फोटो

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत 293 जनावरांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती डॉ. एम. आर. घंगाळे यांनी दिली. पशुवैद्यकीय शिबिर कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अजीत चव्हाण, रमेश चव्हाण, संदीप कानवडे, कृषिकन्या विनीता नोरोव्हा, अनुश्री माने उपस्थित होते. याप्रसंगी गाई, म्हशी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना कृषिकन्यांनी जंतनाशक औषधे, लसीकरण व खनिज मिश्रण यांची माहिती दिली. प्रात्यक्षिक करण्यासाठी कृषि अभियांत्रिकिचे पांडुरंग सोळसे यांचे सहकार्य लाभले. लवकरच अवसरी गावात कृषी कन्यांच्या वतीने कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कृषिकन्या शिवानी लोखंडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)