अवसरी बुद्रुक येथे मुक्‍तादेवी यात्रौत्सव उत्साहात

अवसरी-आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील मुक्‍तादेवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रा उत्सवात अवसरी येथील विद्या विकास मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थांनी मुक्‍तादेवीचे दर्शन घेतले. आलेल्या तीन हजार भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यात्रेचे नियोजन हिंगे पाटील, चवरे, एलभर समाजाच्या वतीने करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत असे की, अवसरी बुद्रुक व मेंगडेवाडी गावच्या हद्दीत मुक्‍तादेवी मातेचे मंदिर आहे. या देवीचा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यात दर मंगळवारपासून गावातील व बाहेर गावावरून महिला देवीची चोळी पातळ व पुरण पोळीचा नैवद्य पारंपरिक वाद्याच्या तालावर वाजत गाजत आणत असतात. आषाढ महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारपासून हिंगे पाटील, चवरे, एकलभर समाज अवसरी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मुक्‍तादेवी भंडारा साजरा करण्यात येतो. सकाळी देवीचा अभिषेक, होम हवन, चोळी पातळ, पुरण पोळीचा नैवद्य देण्यात आला. सायंकाळी अवसरी येथील विद्या विकास मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन हजार विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ बाहेरगावावरून आलेले भाविक भक्‍तांना प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हिंगे वस्ती येथील हिंगे पाटील, चवरे, एलभर समाजाच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)