अवसरी बुद्रुक येथे चार लाखांची चोरी

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील गुणगेमळ्यात ताराबाई गुणगे यांच्या बंद बंगल्याचे कुलूप कटरने कट करुन अज्ञात चोरट्यांनी कपाटात असलेली रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि. 25) पहाटे घडली. मंचर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

अवसरी बुद्रुक गावातील गुणगेमळा येथे ताराबाई धोंडिभाऊ गुणगे आणि त्यांचा मुलगा प्रदीप हे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर बंगल्याला बाहेरुन कुलूप लावून टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास गाईचे दूध काढण्यासाठी प्रदीप हे खाली आले असता त्यांना बंगल्याचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडलेला दिसून आला. घरातील कपाटात असणारे बारा तोळे सोन्याचे दागिने, वीस तोळे चांदीचे दागिने आणि 95 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ, पोलीस कर्मचारी सुनील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)