अवसरी बुद्रुक ते पारगाव रस्त्यावरील झाडे धोकादायक

  • समोरासमोर आलेल्या वाहनाचालकांना करावी लागते कसरत

मंचर – मंचर-शिरूर रस्त्यावर अवसरी बुद्रुक ते पारगाव या रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे,झुडपे वाढल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठा अपघात होण्याआधी रस्त्यालगत असलेली धोकादायक झाडे काढून टाकावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करत आहेत.
आंबेगाव तालुक्‍यात मंचर, अवसरी, पारगाव या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दिवसभरात हजारो वाहने पहाटे ते रात्री एक वाजेपर्यंत ये-जा करीत असतात; परंतु अवसरी बुद्रुक ते मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव रस्त्यालगत मोठ्‌या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत आणि ती रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यावर वाहनचालकांना झाडांमुळे समोरून आलेली वाहने दिसत नाही. मेंगडेवाडी-पारगाव या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्यावर अहोरात्र वाहतूक चालू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याने भीमाशंकर कारखाना असल्याने साखरेचे टक, खाजगी दूध टॅंकर, भाजीपाला वाहतूक करणारे मोठे टक ये-जा करतात; परंतु काही वाहनचालक नवीन असल्याने झाडांमुळे डायव्हरच्या समोरून आलेली वाहने दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने अवसरी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव या गावालगत रस्त्यालगतच वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी झाडे-झुडपे काढून टाकावीत, अशी मागणी वाहन चालक करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)