अवसरी बुद्रुकचे 39 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी

अवसरी – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर येथे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ओमकार नवनाथ भगत हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आठवा आला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. हळदे यांनी दिली. याबरोबरच मानसी थोरात, साक्षी टाके, आदिती बोराडे, श्रीकार वर्पे, सुयश सोनवणे, पायल चव्हाण, प्रज्वल पाचपुते, दयानंद डोंगरे, प्रज्वल गावडे, तेजस गोरडे, आदिती गाढवे, सानिका हिंगे ,अवधूत मडके, असावरी गावडे, श्‍वेता बोराडे, मनीषा शिंदे, प्रतिक गावडे, प्रांजल थोरात, सुदर्शन वळसे, निशांत गलांडे, सृष्टी भोजने, विशाल धोत्रे, चिन्मय पोखरकर, प्रांजल हिंगे, साक्षी वायाळ, साहिल मान्दोल, मोहित हिंगे, चिन्मय सिनलकर, सार्थक बांगर, अभिजीत शिंदे, आरती शिंदे, सानिया शिंदे, शुभदा जाधव, वैष्णवी टाव्हरे, प्रतुल गोरडे, ज्ञानेश हिंगे, आदित्य वाकचौरे, अथर्व त्रिवेदी या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विभाग प्रमुख एस. के. जारकड, सी. पी. शेवाळे, एन. बी. लंगडे, एस. आर. पवार, एन. आर. टावरे, एस. के. सोनवणे, एस. डी. शेळके, आर. डी. वैरागर आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा ग्रामस्थच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)