अवसरी फाटा-मंचर ते एकलहरे चक्का जाम

मंचर- अवसरी फाटा-मंचर ते एकलहरे अशी तीन किलोमीटर लांब वाहनांची गर्दी झाल्यामुळे रविवारी (दि. 10) दिवसभर अनेक प्रवाशांना वाहतुककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. रस्ता रुंदीकरण आणि बायपास रस्त्यांचे रखडलेले काम यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
पुणे-नाशिक महामार्ग वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे जाम झाला होता. दिवाळीची सुट्टी संपल्याने कामावर रुजू होण्यासाठी पुणे, मुंबईला जाणाऱ्या प्रवासी बांधवांची गर्दी झाल्याने, तसेच शिर्डीसाठी पायी पालखी घेऊन जाणाऱ्या साईभक्तांची ये-जा रस्त्याने चालू झाल्या कारणाने रविवारी (दि. 10) दिवसभर रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.ट्रॅफिकमध्ये अडकल्याने बहुतांशी नागरिकांना वाहनांच्या लाईनमध्ये तासन्‌ तास तिष्ठत राहावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)