अवसरी – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात गोकुळअष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अवसरी, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी आदींसह तालुक्‍याच्या पूर्वभागात दहीहंडीचा कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. अवसरी बुद्रुक येथे मुख्य बाजारपेठ येथे तर अवसरी खुर्द येथे साई चौक, सुतार आळी, खालची वेस येथील नवरत्न नवजीवन गणेश मंडळ, गणेश कोष्टी मित्रमंडळ, साई श्रद्धा गणेश मंडळ, श्रीनाथ शॉपी, श्री राम मंडळ (भैरवनाथ चौक) याठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. अवसरी खुर्द येथील बजरंग दलाच्या युवकानी या सर्व दही हंडी फोडण्याचा मन मिळवला. भैरवनाथ चौकातील दहीहंडीला बजरंग दलाच्या मोठ्या युवक मंडळाने सलामी दिली आणि बजरंग दलाच्या लहान मंडळाने दहीहंडी फोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)