अवसरी ग्रामपंचायतीतर्फे शिलाई मशीन वाटप

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून 30 गरजू महिलांना मोफत शिलाई मशिनचे वाटप जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात व सरपंच सुनीता कराळे यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती सरपंच सुनिता कराळे यांनी दिली. चौदाव्या वित्त आयोग सन 2017/18 मध्ये महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अनुसूचित मागासवर्गीय 12 महिलांना शिलाई मशीन व जनरल महिलांना 18 अशा एकूण 30 महिलांना मोफत शिलाई मशीन ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष भरत भोर, सामाजिक कार्यकर्ते आनंदर पाटील भोर, माजी उपसरपंच निलेश टेमकर, दिनेश खेडकर, ग्रामविकास अधिकारी आर. एन. गाढवे, महिला ग्रामपंचायत सदस्या, सदस्य व महिला लाभार्थी उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)