अवसरी खुर्द येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

संग्रहित छायाचित्र

अवसरी -आंबेगाव तालुक्‍यातील अभंगमळा -अवसरी खुर्द येथील श्री सावता महाराज मंदिर येथे शनिवार दि. 31 ते 7 एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्रामस्थांनी दिली. दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, नेमाचे भजन, हरिकीर्तन, हरिजागर अशा दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 31) भाऊसाहेब यादव यांचे हरी कीर्तन रात्री 9 वाजता होणार आहे. रविवारी (दि. 1) रोहित बोराटे, सोमवारी चंद्रकांत पानसरे, मंगळवार संतोष बढेकर, बुधवारी रामदास म्हेत्रे, गुरुवारी सचिन बेंडे, शुक्रवारी हभप नामदेव महाराज वाळके यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी मनोहर सिनारे यांचे काल्याचे कीर्तन सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत सावता महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)