अवसरी खुर्द येथे श्रीराम जन्मोत्सव

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा रविवारी (दि. 25) सकाळी अत्यंत उत्साहात पार पडला. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह काळामध्ये रोज नंदिकेश्वर पोथी मंडळाने ग्रंथ वाचन केले. जोगेश्वरी महिला मंडळाने नित्याचा हरिपाठाची सेवा केली. श्री विट्ठल प्रासादिक भजन मंडळाने रोज हरी भजनाचा कार्यक्रम सादर केला. राम जन्मोत्सवानिमित हभप रोहिदास महाराज भोर यांचे कीर्तन झाले. यावेळी रोहिदास महाराज भोर कीर्तन रुपी सेवेत म्हणाले की, पृथ्वीवर जेव्हा जेव्हा वाईट प्रवृत्ती वाढीस लागतात तेव्हा तेव्हा देवाला विविध रुपात भूतलावर अवतार घ्यावा लागला आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. तसेच विद्युत रोषणाई केली होती. गणेश कोष्टी, शुभम खोल्लम, चेतन वाघमारे, शैलेश भालेराव, पुजा रामवत यांनी मंदिर व परिसरात सप्तरंगी रांगोळ्यांचे गालिचे रेखाटले होते. मंदिर परिसरात सजावटीमुळे मंदिर आणि परिसर भाविकांचे आकर्षण ठरले होते. राम जन्मोत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सीतारामदास बुवा बैरागी आणि परिवाराने केले होते. उत्सव कालावधीमध्ये सोमकांत खोल्लम, काळूराम राजगुरू, रमेश भोर, संतोष कसाब, दीपक ठेंबेकर यांनी व मयूर गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. राम जन्मासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)