अवसरी खुर्द येथे जागोजागी कचऱ्याचे ढीग

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील रिकाम्या जागेत ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. पावसामुळे कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावात शासकीय कॉलेज सुरु झाले असल्याने बरेचसे विद्यार्थी गावात वास्तव्यास आहेत. त्यामुळे गावची लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गावठाण अंतर्गत जागोजागी सिमेंटच्या कचराकुंड्या उभ्या केल्या आहेत. परंतु, हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कोणतीच सुविधा नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ दुर्गंधी पसरली आहे.
खालची वेस, दत्त मंदिर परिसर, मुख्य बाजारपेठ येथे ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्‌यातील कचरा पावसामुळे कुजला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेजवळ असलेली कचरा कुंडी अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)