अवसरी खुर्द ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचे प्रस्थान

मंचर- अवसरी खुर्द ते शिर्डी साईबाबा पालखी दिंडी सोहळ्याचे रविवारी (दि. 11) सकाळी 8 वाजता अवसरी खुर्द येथून प्रस्थान झाले. मंचर येथे ग्रामस्थांनी साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
अवसरी खुर्द येथील वनिता विठ्ठल अभंग, प्रशांत अभंग, राहुल अभंग आणि अभंग कुटुंबियांनी 11 वर्षापूर्वी अवसरी खुर्द ते शिर्डी साईबाबा पायी पालखी दिंडीचे नियोजन केले. पहिल्या वर्षी अवसरी आणि मंचर येथील 200 ते 250 साईभक्त पायी पालखी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. दरवर्षी प्रतिसाद वाढत गेल्याने आता या दिंडी सोहळ्यात अवसरी, निरगुडसर, पारगाव, चांडोली आदी गावांतील सुमारे 450 साईभक्त सहभागी झाले आहेत. दत्त आळीमार्गे मुख्य बाजारपेठमार्गे साईबाबांच्या दिंडीचे प्रस्थान झाले. पालखी दिंडीचे पाच मुक्काम असून सोहळा नारायणगाव, घारगाव,चंदनापुरी, निळवंडे, कोऱ्हाळे या मार्गाने जाणार आहे. साईभक्तांना प्रशांत अभंग यांच्या वतीने चहा, नाश्‍ता, जेवण,मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता पालखी शिर्डी येथे पोहोचल्यानंतर ढोल,लेझिम अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात येते. मिरवणुकीत सर्व साईभक्त सहभागी होत असल्याची माहिती प्रशांत अभंग यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)