अवसरी खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे

मंचर-आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील आदर्शगाव अवसरी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल शिंदे यांची बिनविरोध निवड मंगळवारी करण्यात आली आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आदर्शगाव अवसरी खुर्द गावच्या सदस्यपदाची निवडणूक तीन वर्षांपूर्वी पार पडून पाच वर्षांसाठी तीन महिला सरपंच व पाच उपसरपंचपदी यांना संधी देण्याचे ठरले आहे. त्यानुसार पहिल्या वीस महिन्याकरीता शकुंतला शिंदे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी निलेश टेमकर यांची निवड झाली. सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील वीस महिन्यानंतर सरपंचपदासाठी सुनिता प्रसाद कराळे यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदासाठी सार्थक राजीव अभंग यांची निवड करण्यात आली. उपसरपंच सार्थक अभंग यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आज मंगळवारी सकाळी अवसरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक पदाची प्रक्रिया पार पडली.
उपसरपंचपदासाठी अनिल बाळु शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. व्ही. गाढवे यांनी काम पाहिले. नूतन उपसरपंच अनिल शिंदे यांचा सत्कार सरपंच सुनिता कराळे, उपसरपंच सार्थक अभंग यांनी केला. याप्रसंगी माजी उपसरपंच निलेश टेमकर, दिनेश खेडकर, ग्रामपंचायत सदस्य विकास भोर, प्रमोद शिंदे, निलेश टेमकर, मल्हारी वायाळ आणि ग्रामपंचायत सदस्या रेश्‍मा देवकर, प्रतिभा खेडकर, रंजना साबळे, प्रियंका गुरव, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे, शरद सहकारी बॅंकेचे संचालक विजय टेमकर, पोलीस पाटील संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राजीव वायकर, सुनील भोर, बंडोपंत खोल्लम, विजय भोर, नंदा शिंदे, बाळु बोत्रे, राहुल शिंदे यांनी नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)