अवसरी खुर्दमध्ये 40 जणांची आरोग्य शिबीर

अवसरी – अवसरी खुर्द ग्रामपंचायत आणि डॉ. अश्‍विन पोरवाल यांचे हिलींग हॅन्डस क्‍लिनीक यांच्या संयुक्‍त विद्यमाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन सरपंच सुनिता कराळे व संगिता शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपसरपंच अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य निलेश टेमकर, प्रसाद कराळे, पोलीस पाटील संतोष शिंदे, डॉ. व्ही. एन. खटके आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये डॉ. मयूर नारायणकर यांनी पोटाचे सर्व विकार मूळव्याध, भगंदर, हार्निया आदींवर तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. या शिबिरामध्ये 40 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. व्ही. एन खटके, के. डी. पारधी, आर. जी. परदेशी, के. एस. शिंदे, विद्या शिंदे यांनी सहकार्य केले. या संपूर्ण शिबिराचे नियोजन अनिता सैद यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)