अवसरी खुर्दमध्ये सर्रास वृक्षतोड

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द गावात परराज्यातील पाच ते सहा जण गेल्या सात ते आठ वर्षांपासून वास्तव्यास असून, हे लोक सर्रास शासनाची कोणतीच परवानगी न घेता वृक्षतोड करीत आहेत. मात्र, या अनधिकृत वृक्षतोडीकडे वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
अवसरी खुर्द येथील शिंदे मळा येथे वृक्षतोड करणारे परराज्यातील पाच ते सहा जण गेल्या सात वर्षांपासून वास्तव्यास आहेत. अनधिकृत वृक्षतोड करणारे लोक वनविभागाची किंवा ग्रामपंचायतीची कोणतीच शासकीय परवानगी न घेता सर्रास जुनी झाडे तोडून विकत आहेत. शासन वृक्ष लागवड करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे.मात्र, दुसरीकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन सर्रास सात वर्षांपासून येथे बेकायदेशीर वृक्षतोड चालू आहे. वनविभागाने तातडीने विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्या या परराज्यातील लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अवसरी खुर्द येथील ग्रामस्थ करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)