अवसरी खुर्दच्या मिरवणुकीत वारकऱ्यांचे भजन

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील गणेश विसर्जन मिरवणुका डीजे विरहित संपन्न झाल्या. भजन, लेझीम झांज पथकाच्या निनादात कार्यकर्ते आणि महिलांनी नाचुन आनंद व्यक्त केला. मिरवणुकीत आळंदी येथील वारकऱ्यांचे भजनी मंडळ अग्रभागी होते.
मानाचा पहिला गणपती मयुर गणेश मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी होता. श्री भैरवनाथ चौकातुन विसर्जन सोहळ्यास सुरुवात झाली. गेले 21 वर्षाची अखंड परंपरा राखीत न्यू अमर बॅंड पथक बारामती यांनी या वर्षी मिरवणुकीत सहभाग घेऊन उपस्थित रसिकांची दाद मिळवली. आकर्षक पुष्प रथामध्ये विराजमान श्रींची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधुन घेत होती. ओतुर येथील रिदम डान्स ग्रुपने गणेश वंदना व दशावतार नृत्याने रसीकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अत्यंत शिस्तबद्ध असे नावलौकिक या मंडळातील सर्व सदस्यांनी पांढरा शुभ गणवेश व गुलाबी फेटे परिधान केले होते. गुलाल, डीजे विरहीत मिरवणुकीची अखंड परंपरा या मंडळाने सलग 40 वर्षे जोपासली असल्याने अवसरी व परिसरात या शिस्तीने अनुसरण इतर मंडळांनी केलेले दिसून आले. त्यानंतर खालच्या शिंदेमळा समस्थ ग्रामस्थांनी एकत्र गणपती विसर्जन मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीपुढे आळंदी वारकरी भजन ठेवण्यात आले होते. या मिरवणुकीत महिला मोठठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यापाठोपाठ बोल्हाईमळा गणेश मंडळाच्या मिरवणुकीपुढे स्थानिक महिलांचे ढोल, लेझीम, झांज पथक होते. त्यानंतर खालची वेस खडकगाव, खालची वेस कोळीमळा व गसवठाण अंतर्गत सर्व गणेश मंडळाने मिरवणुकीपुढे पारंपारिक वाद्य, झांजपथक, बॅंन्जो, ढोल लेझीम पथक लावण्यात आले.
मयुर गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे नियोजन ज्येष्ठ संचालक हरिदास रामवत, सोमकांत खोल्लम, शांताराम भालेराव, सुदेश खेडकर, शैलेश भालेराव यांनी केले. अवसरी खुर्द सुतार आळी येथील श्री दत्त गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पांढराशुभ्र पोशाख परिधान केला होता व मिरवणुकीपुढे शंखानाद, ढोल लेझीम पथक ठेवण्यात आले होते. श्रीनाथ युवा गणेश मंडळाच्या वतीने मिरवणुकीपुढे झांज व ढोल-लेझीम पथक ठेवले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)