अवसरीत 22 वर्षांनंतर पुन्हा भरला वर्ग

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर या शाळेतील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला 2 एलसीडी टीव्ही भेट दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शाळेतील दहावीच्या 1996-97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन आयोजित केले होते. यानिमित्त शाळेच्या वर्गाला आकर्षक सजावट केली होती. यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कार्याध्यक्ष गणपत हिंगे, सचिव वसंत हिंगे, जयसिंग हिंगे, शांताराम हिंगे, उपसरपंच सचिन हिंगे, दीपक चवरे आदी उपस्थित होते. शाळेचे माजी प्राचार्य शाम कसाब, प्राचार्य रमेश हळदे, चंदकांत शेवाळे, नंदकुमार लगडे, दत्तात्रय अभंग, अंकुश शिंगाडे, रजनी हिंगे, सुषमा कसाब, अर्चना चव्हाण, बबन गुणगे, ताराबाई जाधव आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)