अवसरीत शटर उचकटून कपड्यांच्या दुकानात चोरी

सव्वा लाख रुपये किंमतीचा माल केला लंपास

अवसरी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील यशराज जेन्ट्‌स शॉपी, किड्‌स वेअर या दुकानात शनिवारी पहाटे चोरट्याने शटर उचकटून सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे कपडे चोरून नेले आहेत. अवसरीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी संतोष गुलाब आरुडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अवसरी खुर्द स्टॅंडच्या जवळील गाळ्यामध्ये धनश्री संतोष आरुडे यांचे कपड्यांचे दुकान आहे. चोरट्यांनी पहाटे सुमारे पावणे चारच्या सुमारास सीसीटीव्हीचे कनेक्‍शन कट केले व दुकानाचे शटर उचकटून लहान मुलांचे पॅंट, शर्ट, फ्रॉक आदी कपड्यांची चोरी केली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. पांचाळ, रमेश करंडे यांनी दुकानाची पाहणी केली आणि चोरीस गेलेल्या मालाचा पंचनामा केला आहे.
अवसरी खुर्द येथील श्री काळभैरवनाथाची शुक्रवार आणि शनिवार यात्रा असल्याने दुकानदार आरुडे यांनी कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. विशेष म्हणजे शुक्रवारी सांयकाळी सात वाजेपर्यंत या दुकानाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु होते. कॅमेरे बसवून चोवीस तास होण्याच्या आतच दुकानात चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी परिसरातील प्रशांत आनंद हिंगे पाटील यांच्या खताच्या दुकानात चोरी झाली होती. चोरट्यांनी महागडी औषधे, बिटाचे बियान्याचे डबे, मेथीचे पोती अशी एक लाख 87 हजार रुपयांचा माल चोरला होता. गेल्या पंधरा दिवसांत अवसरी परिसरात तीन-चार ठिकाणी चोऱ्या झाल्यामुळे ग्रामस्थांनी गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)