अवसरीत विहिरीत पडलेला कोल्हा, ससा सुखरूप

अवसरी- पिराचा टेमकरमळा (अवसरी खुर्द) (ता. आंबेगाव) येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या कोल्हा आणि ससा याना मंचर वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान मिळाले, अशी माहिती वनपाल विजय वेलकर यांनी दिली. अवसरी खुर्दच्या पूर्वेस असणारा पिराचा टेमकर मळा येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक विहिरी शेजारून पहाटे पाच वाजताच्या सुमारास शेतकरी रामदास टेमकर जात असताना त्यांना विहिरीतून प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी मळ्यातील युवकांना याबदल माहिती दिली. तुषार अशोक बाणखेले यांनी वनपाल विजय वेलकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. मंचर विभागाचे विजय वेलकर, महादू तांबडे, विशाल तांबडे, विलास वाजे, गणेश सोनवणे यांनी आणि स्थानिक युवकांनी मदत करून विहिरीत पडलेला ससा आणि कोल्हा यांना बाहेर काढून सोडून देण्यात आले. याविषयी माहिती देताना विजय वेलकर म्हणाले की, रात्री रानटी सशाचा पाठलाग करताना कोल्हा आणि ससा विहिरीत पडला असावा, अशी शक्‍यता वेलकर यांनी व्यक्‍त केली. सुमारे साडेतीन वर्ष वयाचा कोल्हा विहिरीतून शिडी, दोरी, प्लॅस्टिक क्रेटच्या साह्याने वनविभागाच्या कर्मचारी आणि स्थानिक तरुणाच्या मदतीने सुटका केली. यावेळी महेंद्र टेमकर, जगदीश टेमकर, हरीश टेमकर, अनिल टेमकर, अमोल टेमकर यांनी मदत केली. गेल्याच आठवड्यात वायाळ मळा येथे शेतकरी पठारे यांच्या विहिरीत पडलेले कोल्हा बाहेर काढून जीवदान दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)