अवसरीत रंगला कुस्त्यांच्या आखाडा

अवसरी- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील एकलव्य तालीममध्ये कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. यावेळी माती आणि मॅट विभागातील कुस्ती स्पर्धेत शंभर पेक्षा जास्त मल्ल सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, गौतम रोकडे, गेनभाऊ हिंगे, उपसरपंच सचिन हिंगे, राहुल हिंगे, आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष राजेंद्र पाबळे समवेत ग्रामस्थ आणि आंबेगाव तालुक्‍यातील कुस्ती शौकीन उपस्थित होते.
माती विभागात 57 किलो गटात निखिल वाघ, 61 किलो गटात रोहित पारधी, 70 किलो गटात सहादू आव्हाड, 74 किलो गटात माउली शिंदे, 79 किलो गटात अविनाश शेटे यांची निवड झाली आहे. मॅट विभागात 57 किलो गटात सचिन धाडवड, 61 किलो गटात समीर टेमगिरे, 65 किलो गटात अक्षय शेटे, 70 किलो गटात विलास आव्हाड, 74 किलो गटात सौरभ मिंडे, 86 किलो गटात अविनाश मुलूक, 97 किलो गटात रघुनाथ आव्हाड, 86 किलो गटात स्वप्नील कोकणे या खेळाडूंनी जिल्हा निवड चाचणीत यश मिळवले. स्पर्धेसाठी एकलव्य तालमीचे अध्यक्ष संदीप हिंगे, सागर हिंगे, अक्षय शेटे, प्रशांत हिंगे, अविनाश शेटे यांनी नियोजन केले. पंच म्हणून धोंडिभाऊ पाबळे, विजय दाते, तुषार गोळे, संदीप जगदाळे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)