अवसरीत मंडळांकडून विविध कार्यक्रम

मंचर-आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी गावातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू स्पर्धा कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे
अवसरी खुर्द श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाने चालु वर्षी आकर्षक विद्युत रोषणाई केली असून मंडळाचे तिसरे वर्षे आहे. मंडळाने रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू स्पर्धा, आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश शिंदे, सोनु कसाब, दिगंबर शिंदे यांनी दिली. खालची वेश येथील नवजीवन गणेश मंडळाचे चालू वर्षी 40 वे वर्ष असून मंडळाच्या वतीने गणेश जयंतीला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये प्रवचन कीर्तन व महिलांसाठी तिळगुळ, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विश्‍वास शिंदे पाटील यांनी दिली.
सुतारआळी येथील श्री दत्त सेवा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गणपती मंडळ गुलाल व डी.जे. विरहीत मिरवणूक काढत असून मिरवणुकीपुढे शंखनाद करत असतात. ढोल-लेझीम पथक असते. मंडळाचे कार्यकर्ते एक सारखा पेहराव करत असतात. मंडळ महिलांसाठी विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, पुरूषोत्तम ठेंबेकर यांनी दिली. मानाचा राजा असलेल्या मयूर गणेश मंडळाचे चालू वर्षी 39 वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने भजन स्पर्धा, वृक्षारोपण, रक्‍तदान, दिपउत्सव यासारखे उपक्रम राबवित आहे. मंडळ गुलाल व डी.जे. विरहीत 37 वर्षे मिरवणूक काढीत असून गणपती मिरवणुकीच्या पुढे बारामती येथील न्यू अमर ब्रास बॅन्ड व नाशिक येथल बाबुलाल ब्रास ब्रॅन्ड असतात. कोणाकडून वर्गणी गोळा न करता कार्यक्रम राबवित असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत खोल्लम यांनी दिली.
मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरीदास रामवत, सुदेश खेडकर, शैलेश भालेराव, देवेंद्र जंगम, बाळासाहेब गायकवाड, दीपक ठेंबेकर, शांताराम भालेराव, मनोज काळदंते, शामकांत शिंदे विशेष परिश्रम घेत आहे. मुख्य बाजारपेठेतील श्रीराम गणेश मंडळाने विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरात गणपती बसविला असून चालू वर्षी मंडळाने साध्या पद्धतीने गणपती बसविला आहे. मंडळाचे हे पाचवे वर्ष आहे.अशी माहिती निलेश खोल्लम, शुभम बोत्रे, सिद्धेश भुजबळ यांनी दिली. साईश्रद्धा गणेश उत्सव मडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतिक म्हणुन महिलांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. मंडळाचे दुसरे वर्ष असून मंडळाच्या वतीने महिलांना वृक्षवाटप हळदीकुंकाचे वाटप करण्यात येते. लहान मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कमल अनंत ठेंबेकर यांनी दिली.
बोल्हाईमाता गणेश मंडळाचे 35 वे वर्ष असून मंडळाच्या वतीने गेली दहा वर्षे सतत तुलसी, रामायण भागवत कथा अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंडळाने दोन वर्षात दहा लाख रूपये खर्च करून बोल्हाईमाता मंदिरासमोर सभामंडप उभारला आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात तालुक्‍यातील महिला बोल्हाईमाता देवीच्या दर्शनाला येत असतात. त्यावेळी आलेल्या भाविक भक्‍तांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येत असल्यची माहिती मंडळाचे अध्यक्ष उत्तम शिंदे यांनी दिली.
खडकमळा येथील नवतरूण मंडळाने विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाने 25 लाख रूपये खर्च करून गणपती मंदिर उभारले असून मंडळ गेल्या 60 ते 70 वर्षांपासून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवित असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कैलास ठकाजी शिंदे यांनी दिली. मातंगवस्ती येथील अण्णाभाऊ साठे गणेश मंडळाने या वर्षी विद्युत रोषणाई केली असून मंडळ लहान मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीपुढे पारंपरिक वाद्य लावून भव्य मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीपुढे पुरूष-महिला, मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी दिली.

  • धार्मिक सामाजिक कार्यक्रम
    बॅंक ऑफ बडोदा जवळील लोहार आळी येथील श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाचे यंदाचे 8 वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत. लहान मुलांसाठी खोखो स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष निलेश तांबे यांनी दिली. मंडळाचे कार्यकर्ते निलेश तांबे, हेमंत शिंदे, विनय गायकवाड, ओंकार गायकवाड, अनिकेत थोरात, प्रसाद थोरात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)