अवसरीत गाडगेबाबा यांना अभिवादन

अवसरी- येथे आंबेगाव तालुका परिट समाजाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच दीनानाथ महाराज शिंदे यांचे गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रवचन झाले. त्यानंतर नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सुरेश गायकवाड, दीपक टेंबेकर, नानाभाऊ रायकर, भालचंद्र रायकर, दत्ता विधाटे, अनिल गायकवाड, महेंद्र टेंभेकर, जयेश रसाळ समवेत अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)