अवसरीतील बंधारा ओव्हरफ्लो

अवसरी-आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक रोकडोबा वस्ती येथील सिमेंट बंधारा पाण्याने भरून वाहू लागला आहे. बंधाऱ्याच्या पाण्यामुळे परिसरातील विहिरीतील पाणीपातळी वाढण्यासाठी महत्वपूर्ण मदत होणार आहे. अवसरी बुद्रुक गावच्यापूर्वेस रोकडोबा वस्तीनजीक असणाऱ्या ओढ्यावर गतवर्षी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर यांच्या निधीतून सुमारे 8 लाख रुपये खर्च सिंमेटचा बंधारा बांधण्यात आला.
उन्हाळ्यात बंधाऱ्याचे खोलीकरण करण्यात आले.पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने हा बंधारा पूर्णपणे भरला आहे. बंधारा भरून बंधाऱ्याच्या सिमेंट भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा फुगवटा अवसरी गावच्या नजीक असलेला पुलाखालून वरील बाजूपर्यंत पोहचला आहे. सुमारे 100 मीटर पेक्षा जास्त लांब ओढ्याच्या पात्रात पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठ्यामुळे मधला हिंगेमळा, खालचा शिवार परिसरातील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेकडो हेक्‍टर शेती ओलिताखाली येणार आहे. बंधारा अवसरी फाटा ते शिरूर रस्त्यालगतच असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)