अवसरीची जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेचे केंद्र

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील

अवसरी- जिल्हा परिषदेची शाळा हे असे एकमेव उदाहरण आहे की ते सर्व सामन्याचे श्रद्धास्थान आहे. गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून तालुक्‍यात नव्हे तर जिल्ह्यात नावाजलेली शाळा म्हणून अवसरी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाहिले जात आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील केले.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात विवेक वळसे पाटील बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडेश हिंगे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेवती वाडेकर, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे, गेनभाऊ हिंगे, अनिल हिंगे, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, केंद्रप्रमुख शत्रुघ्न जाधव आदी उपस्थित होते.
सकाळी गावातून चित्रथाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर स्मरनिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शाळेच्या सभागृह दुरुस्तीचे उद्‌घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. विवेक वळसे पाटील म्हणाले की, गुणवत्तेचे केंद्र म्हणून अवसरीच्या शाळेकडे पाहिले जाते. गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा ग्रामस्थ आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्या जातील. येत्या काळात शाळेसाठी काही गरज लागल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हेमंत विटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिभा शिंगाडे, गीतांजली लोंढे यांनी केले तर शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मोहिनी फुलसुंदर यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)