अवयवदात्याला मिळणार योजनांचा लाभ?

केंद्र शासनाने प्रस्ताव मागविले : रोख रकमेला सर्वांचाच विरोध

पुणे – गेल्या काही वर्षात अवयवदानाबाबत जनजागृती झाली असून दात्यांची संख्याही वाढत आहे. या चळवळीला पाठबळ-प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना देण्याच्या विचारात शासन आहे. यासाठी देशभरातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

एखाद्या व्यक्‍तीला मरोणोत्तर रक्‍त, डोळे, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड हे अवयव दान करता येतात. तर जिवंत असताना यकृत व मूत्रपिंड दान करता येतात. अनेकदा नातेवाईकांसाठी हे दान केले जाते. परंतु मृत व्यक्‍तीच्या नातेवाईकांकडून त्या व्यक्‍तीचे अवयव दान करण्याची चळवळ अजूनही हवी तितकी रुजलेली नाही. त्यामध्ये अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. त्यामुळेच ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

एखाद्या कुटुंबाने संबंधित व्यक्‍तीच्या मरणोत्तर अवयवदानाची इच्छा दाखवली आणि त्यांना त्या बदल्यात पैसे दिले, तर अवयवदान हा एक बाजारच होऊन जाईल. त्यामुळेच यांना पैसे न देता त्यांना प्रोत्साहनपर, कृतज्ञता म्हणून शासनाकडून काही आरोग्य सवलती, प्रवास सवलती आदी देता येतील का, याचा सध्या विचार सुरू आहे. यासाठी दात्यांच्या नातेवाईकांना कोणत्या प्रकारच्या सुविधा किंवा सवलती देता येतील, याचे प्रस्ताव राज्यातील झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍तींकडून शासनाने मागितले आहेत. हा निर्णय झालाच, तर तो देशपातळीवर घेतला जाणार आहे.

अवयवदात्यांना एखादी सवलत किंवा योजना देता येईल का, याचा विचार केंद्र पातळीवरून सुरू आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍तींकडून देशपातळीवर सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र, अवयवदात्याला पैसे द्यावेत असा शासनाचा कोणताही विचार नाही. फक्‍त प्रोत्साहनपर योजना किंवा सवलत देण्याचा विचार आहे.
– आरती गोखले, पुणे समन्वयक, झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)