अवनी वाघीण आठवडाभरापासून होती उपाशी; बछड्यांचाही भूकबळीचा संशय 

यवतमाळ – नरभक्षक अवनी वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल जाहीर करण्यात आला आहे. परंतु, यामधून अवनी आठवडाभर उपाशी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अवनी वाघिणीच्या बछड्यांचे शोधकार्य युद्ध पातळीवर सुरु असून त्यांचाही भूकबळी जाण्याची शक्यता आहे.

वाघिणीला ज्याठिकाणी मारण्यात आले त्याच ठिकाणी तिच्या रक्ताचे आणि त्वचेचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये वाघिणीला ठार करण्याच्या आधी बेशुद्धीच्या औषधाची सुई टोचण्यात आली होती कि नव्हती याची तपासणी करण्यात आली. परंतु यामधून अवनी वाघीण आठवडाभरपासून उपाशी असल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्या बछड्यांनाही शिकार करता येत नसल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्यात अवनी  वाघिणीवरून शाब्दिक एन्काउंटर रंगले आहे तर. तर दुसरीकडे शार्पशूटर शाफात अली खान मनेका गांधी यांच्यावर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)