अवनी वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता – शआफत अली 

यवतमाळ – अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राजकीय वातावरण तापत असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता शआफत अली खानने वर्तवली आहे. अवनी वाघीण जेव्हा शिकार करायची त्यावेळेस तिचे बछडेही तिच्यासोबत असल्याने आणि माणसांना खाल्याने तेही नरभक्षक होऊ शकतात, असा अंदाज शआफत अली खानने व्यक्त केला आहे.

शआफत अली खानने म्हंटले कि, अवनी वाघिणीची बछडे सध्या १० ते ११ महिन्यांचे आहेत. शिकारीची मानसिकता याच वयात घडत असते. सर्व बछडे आईकडून शिकार करण्यास शिकतात. अवनी वाघिणी माणसांची शिकार करताना बछडेही तिच्यासोबत होते. तसेच त्यांनीही माणसांना खाल्ले आहे. माणसांकडेही बछडे शिकार शिकार म्हणून पाहू शकतात. आणि तेही भविष्यात नरभक्षक होतील, असे त्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी आणि महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक एन्कांऊटर सुरु झाला आहे. दोघेही एकमेकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)