“अवनी’ला दीपोत्सवातून श्रद्धांजली

पिंपरी – पिंपरीगावातील शिवबा क्रिकेट क्‍लबच्या वतीने दीपोत्सवातून अवनी वाघिणीला अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दिवाळी सण साजरा करत असताना अवनी या वाघिणीच्या शिकारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरीगावातील शिवबा क्रिकेट क्‍लबच्या वतीने दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. परंतु, पणत्यांच्या माध्यमातून वाघ वाचवा असा संदेश देण्यात आला. तसेच, शिकारीत मृत्युमुखी पडलेल्या अवणी वाघिणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांकडून अवनीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

ओंकार काकडे, शिवा जाधव, अनिकेत कुदळे, आकाश वाळुंजकर, प्रशांत देव, निलेश राठोड, लोकेश राठोड, प्रसाद पोळ, अनिकेत भोसले, प्रसाद जाधव, गणेश दळवी, जयेश शिंदे, सुमीद कुदळे, अक्षय कुदळे, प्रमोद पाटील, प्रसाद पाटील, ऋषीकेश वाळुंजकर, स्वप्नील पाचपुते, सोमनाथ शिंदे, प्रदीक बगाडे, अजीत वाघेरे, प्रथमेश चव्हाण, अनिकेत होले, महेंद्र गायकवाड, योगेश मोटे, अविनाश पाटील, अमित दहाके, विजय पाटील, धीरज प्रभू यांनी या दीपोत्सवाचे संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)