अवघ्या 8 तासांत 4 हजार 800 श्रवणयंत्र जोडणी

“गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली दखल

पुणे – राज्यातील सुमारे 6 हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित शिबिरामध्ये अवघ्या आठ तासांत तबल 4 हजार 800 श्रवणयंत्र जोडणी करण्यात आली. ही संख्या जागतिक विक्रम प्रस्थापित करणारी ठरली असून, त्याची नोंद “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने आणि स्टार्की हिअरिंग फाउंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व टाटा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्‌घाटन माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विल्यम ऑस्टिन, टीम ऑस्टिन, रोहित मिश्रा, सुरेश पिल्लई, आर. वेंकटरमण, कल्याणी मांडके, नंदकुमार फुले, महेश जोशी, रमेश थोरात, उद्योजक विठ्ठल कामत, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी कसोटी क्रिकेटपटू रवी शास्त्री, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, विश्‍वास ठाकूर, निलेश राऊत उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वी आठ तासांच्या कालावधीत एनआरएचएम आणि मणिपूर सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या 3 हजार 991 जोडण्यांचा विक्रम करण्यात आला होता. तो आता मागे पडल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

शरद पवार म्हणाले, “एकाच छताखाली इतक्‍या मोठ्या संख्येने श्रवणयंत्रे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याची जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्याची शक्‍यता आहे. असा उपक्रम पार पडला याचा आनंद वाटतो.’

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा विक्रम प्रत्यक्षात प्रस्थापित करण्यापूर्वी राज्यभरातील 18 जिल्ह्यांत 25 ठिकाणी पूर्वतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. यातून श्रवणयंत्र बसविल्यानंतर श्रवणक्षम होऊ शकणारे कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)