अवघ्या 35 मिनिटांत दोन लाखांची घरफोडी

कदमवाकवस्तीत भरदिवसा प्रकार

लोणी काळभोर-घरात कोणीही नाही ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून अवघ्या 35 मिनिटांच्या कालावधीत 30 हजार रुपये रोख रकमेसह साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 16 हजार 250 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. 24 रोजी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी प्रिती विनोद शिंदे (वय 28, रा. कौशल्या सोसायटी, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती शिंदे या पती व दोन मुलांसमवेत रहातात. दि. 24 रोजी सकाळी त्यांचे पती विनोद शिंदे हे चिंचवड येथे कामाला गेले. तर प्रिती सकाळी साडेअकराच्या सुमारास एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मुलांच्या शाळेंची मिटींग असल्याने त्या गेल्या होत्या. तेथून दीड वाजता परत आल्या. घरातील सर्व कामे केल्यानंतर त्यांनी दुपारच्या सुमारास घराला कुलुप लावून त्या सोसायटीशेजारी किराणामालाच्या दुकानात गेल्या. तेथे थोडा वेळ थांबून त्या घरी परतल्या. त्यावेळी त्यांना दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले. चोरट्यांनी कपाट व त्यातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त फेकलेले होते.चोरट्यानी लॉकरमधील रिंगा, चैन, लॉकेट, नाणे, मणी, कानातील वेल, गंठण, डोरले, वाट्या, अंगठी, मणी मंगळसूत्र कानातील टॉप्स असा एकूण साडेसात तोळे सोन्याचे दागिने व 30 हजार रूपये रोकड, असा एकूण 2 लाख 16 हजार 250 रुपये किमतीचा ऐवज पळविला. याप्रकरणी चोरट्यांविरोधांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)