अवघ्या सात तासात खुनाचा छडा 

इचलकरंजी खून प्रकरण : अल्पवयीन मुलासह तिघे जेरबंद
 
कोल्हापूर – इचलकरंजीमधील वखारभाग येथे पूर्ववैमन्यासातून झालेल्या युवकाच्या खून प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना जेरबंद केले. अवघ्या सात तासात खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इचलकरंजी येथील नेहरूनगर परिसरात राहणारा सनी संजय आवळे (वय 17 रा. नेहरूनगर झोडपट्टी परिसर) हा कामावर जाण्यासाठी शुक्रवारी रात्री घरातून बाहेर पडला होता. त्याला गाठून चाकू, कोयता आदीसह धारदार शस्त्रांनी त्याचे वार करून तिघांनी त्याचा निर्घृण खून केला होता. हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध तीन पथकाद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. रात्री एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. तर या प्रकरणातील मुख्य संशयित अक्षय कोळी व त्याचा साथीदार आकाश बेळगावकर या दोघांना कर्नाटकातील बेल्लद बागेवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

-Ads-

सनी आवळे व अक्षय कोळी हे दोघे मित्र मंडळात एकत्र काम करीत होते. परंतु या दोघांत काही वर्षापासून वितुष्ट निर्माण झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये सतत कुरबुरी सुरु होत्या. तीन दिवसापूर्वी एका विवाह समारंभात हे दोघे समोरा-समोर आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. याच रागातून तिघांनी मिळून सनी याचा खून केल्याचे ही निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)