अवघ्या सहाव्या महिन्यातच जन्माला आलेल्या लहान बाळाला मिळाले जीवनदान!

गर्भधारणेच्या अवघ्या २५ आठवड्यानंतर फक्त ५५० ग्रॅम वजन असलेल्या लहान बाळाचा जन्म झाला परंतु ही केस अतिशय गुंतागुंतीची होती. कारण या बाळाचा जन्म नियोजित वेळेपूर्वी खूप आधी झालेला असल्यामुळे बाळाचे वजन खूप कमी होते. एका ४६ वर्षांच्या महिलेने आयव्हीएफच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. दुर्दैवाने यातील एक मुल जिवंत राहू शकले नाही आणि दुसऱ्या बाळाला श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असल्याने त्याला यंत्रणेद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जात होता.

या बाळाला ‘रेस्पिरेटरी डीस्ट्रेस सिंड्रोम’ झाल्याने श्वास घेण्यात अडथळे येत होते. या बाळाला इन्क़्युबेटर मध्ये ठेवून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. तसेच त्याला सलग ११ दिवस लाइफ सपोर्ट देण्यात आला आणि सीपीएपी नावाची दुसरी श्वसनाची कृत्रिम यंत्रणा पुढील एक महिन्यासाठी त्याला लावण्यात आली. बाळाला पुरेशी पोषण द्रव्ये देता यावीत आणि त्याचा रक्तदाब वेळोवेळी पाहता यावा म्हणून या बाळाच्या नाळेसाठी विशेष कैथेटर तयार करण्यात आले. ०.५ मिलीच्या ट्यूबमधून आईचे दुध बाळाला सुरु करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही कालावधीनंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीत दुधाचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवण्यात आले. अद्ययावत अशी साधने, प्रशिक्षित वैद्यकीय आणि नर्सिंग कर्मचारी वर्ग असल्याने बाळाला व्हेंटीलेटर संबंधित गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या नाहीत.

उपचार करीत असताना बाळाला अतिशय गंभीर स्वरूपाचा असा जंतुसंसर्ग झाला आणि मग निओनेटल इंटेन्सीव्ह केअर युनिट (एनआयसीयू) मध्ये पूर्ण वेळ डॉक्टरांच्या टीमने त्या बाळाची तत्परतेने काळजी घेतली. कोणतीही आणखी गंभीर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. अशक्तपणामुळे त्या बाळाच्याही रक्ताचे रुपांतर करणे गरजेचे झाले होते.

तब्बल ९९ दिवसांच्या अथक प्रयत्न आणि संघर्षानंतर या बाळाला १०० व्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यावेळी बाळाचे वजन १.६७० किलो होते. या बाळाची वाढ आणि विकास यावर यानंतरही काळजीपूर्वक लक्ष दिले जाणार आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये ७०० ग्रॅमहून कमी वजन असलेल्या आणि खूप आधी जन्माला आलेल्या तीन बाळांना यशस्वीरीतीने उपचार देऊन घरी पाठवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)