अवघ्या चौदा वर्षांचा प्राध्यापक!

चौदा वर्षांचा मुलगा ‘होमवर्क’ करीत असताना किंवा मित्रांबरोबर खेळत असताना पाहणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. मात्र, याच वयाचा एखादा मुलगा विद्यापीठात चक्क अध्यापन करीत असताना, विद्यार्थ्यांच्या शंका दूर करीत असताना पाहायला मिळणे ही आश्‍चर्यकारकच बाब आहे. इंग्लंडच्या लिसेस्टर युनिव्हर्सिटीत सध्या हे दृश्‍य पाहायला मिळत आहे. तिथे मूळचा इराणचा असलेला चौदा वर्षांचा याशा एस्ले नावाचा मुलगा प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहे!

हा मुलगा युनिव्हर्सिटीत गणित विषयाचा प्राध्यापक आहे. अर्थात त्याला युनिव्हर्सिटीत अतिथी अध्यापक म्हणूनच घेण्यात आले आहे. तो स्वतः याच युनिव्हर्सिटीत पदवीचे शिक्षणही घेत आहे. मात्र, त्याचे ज्ञान व क्षमता पाहून युनिव्हर्सिटीने त्याला सर्वात कमी वयाचा प्राध्यापक बनवले आहे! याशाचे वडील मुसा एस्ले यांना आपल्या मुलाचा सार्थ अभिमान आहे. त्यांनी सांगितले की, याशाला गणिताची उपजतच आवड आहे. त्याचे गणित विषयातील ज्ञान अविश्वसनीय आहे. अनेकजण त्याला “मानवी कॅल्क्‍युलेटर’ असेही म्हणतात! तो आपले पदवीचे शिक्षण पूर्ण झाले की पीएच.डी. सुरू करणार आहे. तो तेरा वर्षांचा असताना युनिव्हर्सिटी प्रशासनाच्या संपर्कात आला होता. त्याचे ज्ञान पाहून तेथील मोठे मोठे तज्ज्ञही अचंबित झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)