अवघ्या अकरा रुपयांत विवाह नोंदणी!

सामुदायिक सोहळा : कान्हे येथे शंभर एकर जागेवर सोहळ्याची तयारी

वडगाव मावळ – मावळ तालुका वारकरी सांप्रदाय यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या वतीने मावळ तालुक्‍यातील सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अवघ्या 11 रुपयांत सोहळ्यात नोंदणी करता येणार आहे.

येत्या 24 एप्रिल रोजी कान्हे फाटा महामार्गाजवळ संपन्न आहे. याच सोहळ्याच्या जागेचे नुकतेच भूमिपूजन राज्यमंत्री मदन बाफना यांच्या हस्ते करण्यात आले. कान्हे फाटा येथील 100 एकर जागेवर होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये सव्वालाख लोकांची बैठक व्यवस्था, एक लाख लोकांच्या जेवणाची सोय तसेच सुरक्षेसाठी अग्नीशमन दलाची वाहने, ऍम्ब्युलन्स, सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण परिसर त्या दिवशी लावण्यात येणार आहेत. शिस्तबद्ध गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आतापर्यंत या विवाह सोहळ्यामध्ये 102 जोडप्यांची विवाह नोंदणी झाली आहे. गेल्या महिनाभरात मावळात जनजागृती रॅलीचे आयोजित केली होती. त्यामध्ये तालुक्‍यातील 198 गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांची सोहळ्याविषयी संवाद साधून सर्व माहिती देण्यात आली.

प्रत्येक गावातील 109 तरुण मंडळ, 162 महिला बचत गट, कंपनीचे कामगार यांनी स्वयं प्रेरणेने सोहळ्यामध्ये काम करण्यासाठी नावे संस्थेकडे दिली आहेत, अशी माहिती रवींद्र आप्पा भेगडे यांनी दिली आहे. या वेळी माजी सभापती समाज कल्याण अतिष परदेशी, सुकन बाफना, नगरसेवक अमोल शेटे, ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, राजू सातकर, राजेंद्र सातकर, उद्योजक अनिल मालपोटे, शंकरराव सुपे, शांताराम लष्करी, माजी उपसरपंच किशोर सातकर, विलास मालपोटे, ह.भ.प. शंकर महाराज मराठे, ह.भ.प. सुनील महाराज वरघडे, ह.भ.प. रवींद्र महाराज पंडित, ह.भ.प. महादू महाराज कालेकर, ह.भ.प. महादूदादा सातकर व मावळ तालुक्‍यातील सर्व वारकरी सांप्रदाय मावळ प्रबोधिनी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लक्ष्मण शेलार यांनी केले. प्रास्ताविक युवा प्रबोधिनीचे अध्यक्ष रवी शेटे यांनी केले. रोहिदास महाराज धनवे यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)