अवकाळीमुळे द्राक्षबागांना फटका

नुकसान भरपाई त्वरीत मिळण्याची मागणी

म्हसवड, दि. 23 (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे माण तालुक्‍यात द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने नुकसानग्रस्त बागांची पाहणी करून पंचनामे केले आहेत. मात्र गेल्या वर्षातीलच नुकसानीची भरपाई अद्याप दिली नाही. किमान या वर्षातील नुकसान भरपाई तरी तातडीने द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाने देवापूर व पळसावडे परिसरातील द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. देवापूर व विशेषतः पळसावडे परिसरात 250 एकरहून अधिक द्राक्ष बागायत क्षेत्र असून द्राक्ष तोडणीच्या अंतिम टप्प्यातच अवकाळी पावसाने दिलेल्या जोरदार तडाख्यामुळे द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माण तालुक्‍यातील पळसावडे, देवापुर परिसर माण तालुक्‍यातील द्राक्ष पंढरी म्हणून नावारूपाला येत असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत आले. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक सुनील बोरकर यांच्याशी द्राक्ष बागांच्या पंचनाम्यासंदर्भात संपर्क साधला असता नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी करून त्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. माणच्या तहसीलदार माने यांनीही ग्रामसेवक, तलाठी, कृषी असिस्टंट यांच्यामार्फत पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. देवापूर व पळसावडे भागातील 9 द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार माने व तलाठी आकडमल यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)