अल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला 

जयपूर (राजस्थान): अल कायदा कमांडर आणि कडवा दहशतवादी जाकिर याने राजस्थानच्या हद्दीत प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली आहे. जाकिर मूसा आणि त्याचे साथीदार फिरोझपूरमार्गे राजस्थानच्या हद्दीत घुसल्याच्या गुप्त माहितीनंतर राज्यातील बंदोबस्त कडक करण्यात आला असून सुरक्षा एजन्सीजना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यात अल कायदा मोठा घातपात घडवून आणण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

7 डिसेंबर रोजी राजस्थानात होणाऱ्या विधान सभा निवड्‌णुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि कॉंग्रेसच्या मोठ्या मोठ्या रॅलीज होणार आहेत. जाकिर मूसा या रॅलीजना लक्ष्य करण्याची शक्‍यता गृहित धरून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) शैलेंद्र अग्रवाल आणि पोलीस महासंचालक ओ पी मल्होत्रा यांची बैठक झाली आहे.
पंजाबमधील हाय ऍलर्टमुळे जाकिर मूसा आणि अन्य दहशतवादी पंजाबच्या फिरोझपूर मार्गे राजस्थानात घुसले असण्याची शक्‍यता वर्तवण्यात आलेली आहे. पंजाबच्या माधोपूर जिल्ह्यातीला माधोपूरजवळ बंदुकीच्या धाकाने एसयूव्ही कार पळवून देणारे चार दहशतवादी अद्याप बेपत्ता आहेत. दोन्हो राज्यातील सीमेवर बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)